फ्लॅग मिटिंगमध्ये भारताने केली पाकिस्तानची कान उघडणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |


जम्मू-काश्मीर :
भारत-पाक सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारावर भारतीय लष्कराने तीव्र निषेध नोंदवला असून काल झालेल्या भारत-पाक फ्लॅग मिटिंगमध्ये भारताने यावरून पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली आहे. 

सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरजवळ काल सकाळी पाकिस्तानच्या गोळीबारात चार बीएसएफ जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्कराने काल संध्याकाळी पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटिंग घेतली. या फ्लॅग मिटिंगला भारताकडून पी.एस.धीमान आणि पाकिस्तानकडून ब्रिगेडीयर मोहम्मद अमजाद हुसेन हे उपस्थित होते. यामध्ये भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधी पाळण्याविषयी दिलेल्या आश्वासनाच्या मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असल्याचे भारताने म्हटले. तसेच जवानांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत, यापुढे अशी कृती केल्यास भारताकडून योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा थेट इशारा भारताकडून देण्यात आला. यानंतर मात्र पाकिस्तानने सावरते घेत दोन्ही बाजूने चर्चा झाली पाहिजे असे मत मांडले. यावर भारताने सकारात्मक प्रतिसाद देत, सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.

काल सकाळी पाकिस्तानने रामगढ सेक्टरजवळ केलेल्या गोळीबारामध्ये एकूण चार जवान शहीद झाले होते. तसेच पाच जण जखमी झाले होते. एकच वेळी चार जवान शहीद झाल्यामुळे लष्कराने यावर थेट आक्रमक भूमिका घेत, पाकिस्तानच्या या हल्ल्याचा तीव्र प्रतिकार केला होता.
@@AUTHORINFO_V1@@