व्यापक प्रमाणात वृक्षारोपण करून बदलापूर ठरणार हरित शहर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



बदलापूर: बदलापूर शहरात सामाजिक वनीकरण मोहिमेंतर्गत चार टप्प्यांत रस्तोरस्ती होणार्‍या वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनामुळे बदलापूर शहर हरित शहर ठरणार आहे. राज्याच्या सामाजिक वनीकरण मोहिमेंतर्गत 1 जुलैपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिली.

या वालवली डोंगरावर पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. दोन हजार चौ.मी. लॉर्न तसेच फेन्सिंग चैन या परिसराची शोभा वाढवणार आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेसह या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात सोनिवली येथे १०४५ , गावदेवी गार्डन परिसरात १०४५ , मांजर्ली विद्यापीठ डोंगर परिसरात ९५५ , बेलवली पार्क परिसरात ११०० , कात्रप तुलसी विहार परिसरात ६५० , रमेश वाडी रस्ता परिसरात १३८ , होप इंडिया रस्त्यावर ८२ , शिरगाव रस्त्यावर 118 तर बदलापूर बायपास रस्त्यावर तीन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तिसर्‍या टप्प्यात बेलवली येथील आरक्षण क्र. ४८ या जागेवर २१२ , आरक्षण क्र. ४९ या जागेवर १६६८ , कात्रप पाडा येथे ५१३ झाडे तर शिरगाव आरक्षण क्र. ३८ या जागेवर १४१७ झाडे लावण्यात येणार आहेत. कात्रप येथील नियोजित स्टेडियम भोवती 866 झाडे लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी दोन हजार चौ. मी. लॉर्नसह मेन गेट, फेन्सिंग व पाणीव्यवस्था उपलब्ध होणार आहे. या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून देखभालीसाठीही वेगळा निधी खर्च करण्यात येणार आहे तर चौथ्या टप्प्यात नगरपालिका फंडातून ७५ लाख रुपये खर्च करून ३ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये पिंजरा तसेच तीन वर्ष देखभालीचा खर्चही समाविष्ट असणार आहे.

या कामासाठी सुमारे पावणेपाच कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून नगर परिषद फंडातून ७५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याशिवाय सोसायट्यांना झाडे पुरविण्यासाठी १५ लाख रुपये व झाडांसाठी खड्डे खोदण्यासाठी सहा लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या झाडांची पाच वर्ष देखभाल करण्यात येणार असून देखभालीचा खर्च नगर परिषद करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@