जीना हॅस्पल: महिला गुप्तहेर प्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
जीना हॅस्पल यांची वर्णी लागणं अपेक्षितच होतं, पण कमला हॅरिस नावाची मूळ भारतीय वंशाची एक खासदार महिला जीना यांच्या विरुद्ध आहे आणि ती संसदीय गुप्तवार्ता समितीची सदस्या आहे. त्यामुळे जीना हॅस्पल यांची नेमणूक जरा वांद्यात आली होती, पण अखेर सगळे विरोध बाजूला ठेवून, त्यांची निवड झाली आहे.
 
 
अमेरिकेचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे क्रमाने पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत. सन १७८९ साली जनरल जॉर्ज वॉशिंग्टन हा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्यापासून आज डोनाल्ड ट्रम्पपर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांमधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळेच्या सगळे प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहेत. याला एकमेव अपवाद म्हणजे जॉन केनेडी. तो कॅथलिक होता, पण राष्ट्राध्यक्ष बनल्यावर दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच त्याचा खून झाला. बराक ओबामा हे आफ्रिकन, मुसलमान पिता आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चन माता यांचं अपत्य, पण ते स्वत:ला निष्ठावंत प्रोटेस्टंट म्हणवतात. ट्रम्प हेही प्रोटेस्टंटच आहेत.
 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यादीत एकही महिला नाही. बराक ओबामांच्या चार-चार वर्षांच्या दोन कार्यकाळांमध्ये (२००८ ते २०१२, २०१२ ते २०१६) अमेरिकेन संसदेने मानवाधिकार, विविध वंचित समाजगटांना इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सर्व प्रकारचे अधिकार इत्यादींची अगदी खैरातच केली. त्यामुळे असं वाटत होतं की, आता ओबामांनंतर हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा बनणार. हिलरी या पदासाठी सर्वथैव लायक होत्या यात शंकाच नाही, पण मतदारांनी त्यांना नाकारलं आणि ट्रम्प यांना निवडलं. ट्रम्प यांना सत्तारूढ होऊन दीड वर्ष (जानेवारी २०१७) उलटून गेलं असलं, तरीही त्यांच्या निवडणुकीतल्या अनेक गैरप्रकारांची चर्चा चालू आहे.

 

ते कसंही असो. एक महिला राष्ट्राध्यक्षपदी बसू शकली नाही, एवढं खरं, पण ट्रम्प सरकारने नुकतीच एका महिलेची, देशाच्या अत्यंत शक्तिमान अशा गुप्तहेर प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. त्या महिलेचे नाव आहे जीना हॅस्पल. २१ मे २०१८ पासून ६१ वर्षांच्या जीना हॅस्पल यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी उर्फ सी. आय. ए. या अमेरिकेच्या सुप्रसिद्ध गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदाची धुरा घेतली आहे. त्यांच्या आधीचे सी. आय. ए. प्रमुख माईक पाम्पिओ हे आता ट्रम्प सरकारमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी जीना हॅस्पल यांची वर्णी लागणं अपेक्षितच होतं, पण कमला हॅरिस नावाची मूळ भारतीय वंशाची एक खासदार महिला जीना यांच्या विरुद्ध आहे आणि ती संसदीय गुप्तवार्ता समितीची सदस्या आहे. त्यामुळे जीना हॅस्पल यांची नेमणूक जरा वांद्यात आली होती, पण अखेर सगळे विरोध बाजूला ठेवून, त्यांची निवड झाली आहे.

 

हे सगळं तपशीलवार सांगण्याचं कारण म्हणजे अमेरिकन राजकारणात काहीतरी विचित्र घडतंय. अमेरिकन राजकारणात दोनच प्रमुख राजकीय पक्ष आहेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. तेच आलटून पालटून सत्तेवर येत असतात. सध्याचे ट्रम्प रिपब्लिकन आहेत. त्यांच्या अगोदरचे ओबामा हे डेमोक्रॅट होते. त्यांच्या अगोदरचे जॉर्ज वॉकर बुश हे रिपब्लिकन होते. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. त्या कॅलिफोर्निया प्रांताच्या खासदार आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन् तामिळ भाषिक हिंदू होती, तर त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे वेस्ट इंडीजमधल्या जमैका बेटांचे नागरिक होते. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातले एक वकील डग्लस एमहॉफ यांच्याशी विवाह केला आहे.(म्हणजे त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या, तरी हिंदू नाहीत) कमला हॅरिस या अत्यंत बुद्धिमान आणि कदाचित म्हणूनच अत्यंत आक्रमक स्वभावाच्या आहेत. २०२० च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणून आत्तापासूनच त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.

 

रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज वॉकर बुश किंवा जॉर्ज बुश धाकटे, यांनी सन २००० ची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक जिंकली. जानेवारी २००१ मध्ये त्यांची प्रत्यक्ष कारकीर्द सुरू झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अल् कायदाच्या अतिरेक्यांनी न्यूयॉर्कचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केलं. यावर उत्तर म्हणून अमेरिकेने ऑक्टोबर २००१ मध्ये प्रथम अफगाणिस्तानवर आणि मार्च २००३ मध्ये इराकवर लष्करी आक्रमण केलं. आतापर्यंत अमेरिकेने म्हणजे अमेरिकन सरकारच्या आशीर्वादाने सी. आय. ए. ने जगभर अनेक कारवाया केल्या होत्या. अनेक देशांमध्ये बंड, उठाव, क्रांती घडवून आणल्या होत्या. अनेक देशांमधल्या मोडून काढल्या होत्या. १९७९ साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात लष्कर घुसवल्यावर, त्यांच्याविरुद्ध अफगाण मुजाहिद आणि त्यांचे पाकिस्तानी सूत्रधार यांना अमेरिकेने पाण्यासारखा पैसा आणि भरभरून अत्याधुनिक हत्यारं पुरवली होती, पण त्याच इस्लामी अतिरेक्यांनी आता खुद्द अमेरिकेवरच हल्ला चढवून, अमेरिकेच्या ‘इज्जत का फालुदा’ केला होता. सर्वशक्तिमान अमेरिका चवताळून उठली. सी.आय.ए. बलाढ्य होतीच, तिला आणखी अधिकार देण्यात आले. भूदल, नौदल, वायुदल यांची आपापली गुप्तवार्ता खाती होतीच. त्यांचा आणि सी.आय.ए. व अन्य गुप्तवार्ता खात्यांचा काटेकोर समन्वय साधण्यात आला. असंख्य संशयास्पद इसमांना कसलाही मुलाहिजा न ठेवता ‘उचलण्यात’ आलं. त्यांची कसून चौकशी सुरू झाली. अल् कायदाचे सगळे माग खणून काढायचे, असा सी.आय.ए.ने निर्धार केला. या उचलबांगडी केलेल्या लोकांमध्ये सारखी भर पडत गेली, कारण अफगाणिस्तान आणि इराक यांच्यावरच्या मोहिमा लगेच सुरूच झाल्या.

 

कैद्यांना मारहाण करणं, अनन्वित छळ करून, त्यांच्याकडून माहिती काढणं, याविरुद्ध आपणच जगभरच्या साम्यवादी किंवा हुकूमशाही राजवटीविरुद्ध भरपूर बोंबाबोंब केली. कैद्यांच्या मानवाधिकारांचं हनन झाल्याचा भरपूर प्रचार केलाय हे सी.आय.ए.ला माहितच होतं, पण असं केल्याशिवाय अतिरेक्यांकडून माहिती काढणार कशी? मग सी.आय.ए.ने अशी ‘माहिती केंद्र’ अमेरिकेबाहेर काढली. अमेरिकेच्या दक्षिणेला कॅरेबियन समुद्रात क्यूबा देशाजवळ ‘ग्वान्तनामो बे’ या ठिकाणी अमेरिकन नौदलाचा मोठा अड्डा आहे. तिथे नि अफगाणिस्तानात कोबाल्ट,सॉल्ट पिट आणि अबू गरीब इथल्या अमेरिकन लष्करी छावण्यांमध्ये ही केंद्र सुरू झाली. ज्याला महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे, अशा इस्लामी अतिरेकी कैद्याला तिथे आणलं जायचं. लाथाबुक्क्यांनी बदडून काढणं, सिगरेटचे चटके देणं वगैरे उपाय आता जुने झाले. सी.आय.ए.ने अगदी साधे सोपे पण प्रभावी नवे उपाय शोधले आहेत. कैद्याला रात्रभर आणि दिवसभर नुसता उभा करुन ठेवतात. एक सेकंदही त्याला बसू दिले जात नाही वा डोळे मिटू दिले जात नाहीत. फक्त ४८ तासांत कैद्याला उघड्या डोळ्यांसमोर काल्पनिक दृश्यं दिसू लागतात. कारण अजिबात झोप नाही. याहीपेक्षा प्रभावी एका फळकुटावर कैद्याला झोपवण्यात येतं. त्याचे हातपाय घट्ट बांधून टाकले जातात. मग त्याच्या तोंडावर एक जाड टर्किश टॉवेल टाकण्यात येतो. मग कैद्याचा ‘हँडलर’ त्या टॉवेलवर पाण्याची धार धरतो. ओला थबथबीत टॉवेल नाका तोंडावर गच्च बसून, कैदी घुसमटतो आणि दोन ते पाच मिनिटांत शरण येतो. प्रत्यक्ष पाण्यात न बुडता आपण आता पाण्यात बुडून श्वास कोंडून, मरणार असा ‘फील’ त्याला येतो. खरं पाहता यात अनन्वित मारहाण यातना, वेदना नाहीत. पण तरीही राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या विरोधातल्या डेमॉक्रॅटिक पक्षाने अबू गरीब आणि ग्वान्तनामोवरुन सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाविरुद्ध प्रचंड गदारोळ माजवला. ज्या इस्लामी अतिरेक्यांनी अमेरिकेचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणलं, त्यांच्याविरुद्ध हे उपाय करण्यात काहीच बेकायदेशीर नाही असं रिपब्लिकन पक्षाच्या आणि निष्पक्ष विचार करणाऱ्या अनेक कायदेतज्ज्ञांनी ठासून सांगितलं. मग या विरोध लोकांनी वेगळाच मुद्दा काढला. ते बेकायदेशीर नसेल कदाचित, पण ते तात्त्विकदृष्ट्या चूक आहे, असं डेमॉक्रॅट्स् म्हणू लागले. काय समर्थन आहे पाहा! ज्या अतिरेक्यांनी तुमचं सर्वश्रेष्ठ आर्थिक केंद्र उद्ध्वस्त करून, किमान तीन हजार माणसं ठार केली, त्यांच्या साथीदारांना कमीत कमीत शारीरिक यातना देऊन, माहिती काढणं, हे तात्त्विकदृष्ट्या चुकीचं?

 

लक्षात घ्या, अमेरिकन राजकारणात काहीतरी विचित्र घडतंय असं मी म्हटलं, ते याच साठी की, सी.आय.ए.च्या प्रमुख पदाकरिता जीना हॅस्पल यांची मुलाखत घेताना संसदीय गुप्तवार्ता समितीच्या डेमोक्रॅटिक सदस्या खासदार कमला हॅरिस यांनी हॅस्पल यांना नेमका हाच प्रश्न विचारला ते (म्हणजे वॉटर बोर्डिंग) बेकायदेशीर नसेल, पण तात्त्विकदृष्ट्या चूक होतं ना? पण ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी!‘ माझ्या कार्यकाळात मी असं घडू देणारं नाही,‘ हॅस्पल उत्तरल्या.

 

आलं का लक्षात? डेमॉक्रेटिक पक्ष आपल्याकडच्या डाव्या विचारवंतांप्रमाणे वागतोय आणि २०२० मध्ये तो सत्तारूढ होण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@