मुक्त विद्यापीठात मोफत वायफाय सुविधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |



नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिसरात आता लवकरच मोफत वाय फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यापीठाचे प्रांगण जिओ डिजिटल कॅम्पस म्हणून अस्तित्वात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. या सुविधेमुळे संपूर्ण परिसर हा वायफाय प्रणालीने युक्त करण्यात येणार असून परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांसाठी मोफत व वेगवान ४ जी इंटरनेट वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहे.

 

यासंदर्भात नुकताच विद्यापीठ प्रशासन व रिलायन्स जिओ कंपनी यांच्यात करार झाला आहे. कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व रिलायन्स जिओ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक महेश देवगडे यांच्यात याबाबत सामंजस्य करार झाला. ही सुविधा लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.

 

दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदाचा कार्यभार जयवंत खडताळे यांना सोपविण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. खडताळे यांनी विद्यापीठाच्या उभारणीपासून आपली सेवा बजावली असून त्यांना विविध स्तरावरील शासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे देशातील सर्व विद्यापीठांचा कॅम्पस डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ‘स्वयम’ पोर्टल हा महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्प आहे.

@@AUTHORINFO_V1@@