जम्मू-काश्मीरमध्ये दोन नव्या 'महिला बटालियन'ला केंद्राची परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये महिला बटालियनच्या दोन नव्या तुकड्या उभारण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. याअंतर्गत जम्मूसाठी एक आणि काश्मीर खोऱ्यासाठी एक अशा दोन तुकड्या तयार करण्यात येणार असून यामध्ये जम्मू-काश्मीरमधील महिलांचीच प्रामुख्याने भरती करण्यात येणार आहे.

या दोन्ही तुकड्यांमधील जागांपैकी ६० टक्के जागा या राज्यातील सीमेजवळील जिल्ह्यातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये जम्मू, सांबा, कठुआ, पुच्छं, राजोरी, बारामुल्ला, बांदीपोरा, कुपवारा, कारगिल आणि लेह या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तसेच उरलेल्या चाळीस टक्के जागांवर मुक्त भरती असणार आहे. या बटालियनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सरकारने दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच या बटालियनच्या उभारणीला सुरुवात करण्यात येईल, असे जम्मू काश्मीर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@