मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या लांबवाव्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2018
Total Views |

 मान्सूनच्या खंडामुळे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 



पुणे : मान्सूनमध्ये होणाऱ्या खंडामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या थोड्या लांबवाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हवामान खात्याने मराठवाड्यातील संभाव्य मान्सूनविषयी वर्तवलेल्या अंदाजानंतर कृषी विभागाने हे आवाहन केले आहे.

येत्या १५ ते २८ तारखेपर्यंत मराठवाड्यामधील मान्सूनमध्ये खंड पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जमिनीचा आणि पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आवाहन राज्य सरकारने काल केले होते. परंतु शेतकऱ्यांनी लवकर पेरण्या करण्याऐवजी पेरण्या थोड्या लांबवाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे देशात लवकर आगमन झाले आहे. परंतु राज्यात मात्र येण्यामध्ये मान्सून नेहमीप्रमाणेच उशीर केला. तसेच अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मात्र पावसाने पुन्हा एकदा दांडी मारण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने आपला जोर कमी केलेला आहे. त्यामुळे काही काळ मान्सूनमध्ये खंड पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याबाबीकडे लक्ष देऊनच पेरण्या कराव्यात, असे आवाहन सरकारकडून देखील करण्यात आलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@