पगडी बदलण्यामागे नक्कीच राजकारण : संजय राऊत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |


पुणे : 'शरद पवार हे कोणतीही गोष्ट कारणांशिवाय करत नाही, त्यामुळे पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी घालण्यामागे नक्कीच काही तरी राजकारण असून ते लवकरच जनतेसमोर येईल' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पुणे शिवसेनेकडून आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

'खरे तर पवारांनी पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान आहे, असे राऊत म्हणाले. पुणेरी पगडी ही पुणेकरांचे वैभव आणि सन्मान आहे. त्यामुळे या पगडीचा मान राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. पण पवारांनी मात्र हे नाकारून पुणेकरांचा अपमान केला आहे. तसेच पवारांच्या प्रत्येक कृतीमागे काही तरी कारण असते. त्यामुळे या पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी घालण्यामागे नक्कीच काही तरी राजकारण असून पगडी खालील हे राजकारण लवकरच जनतेसमोर येईल, असे त्यांनी म्हटले.


गेल्या रविवारी राष्ट्रवादीच्या २० वर्धापनदिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमधून 'पुणेरी' पगडी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. पुणेरी पगडी ऐवजी यापुढे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये 'फुले' पगडीचा वापर करा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे पवारांच्या या निर्णयामागे नक्कीच जातीय राजकारण दडल्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली. निवडणुका जवळ आल्यामुळे बहुजन समाजाची मते आपल्या बाजूने वळवण्याचा हा पवारांचा प्रयत्न असल्याची टीका काही जणांकडून सुरु झाली होती. त्यात राऊत यांनी देखील याला 'राजकारण' म्हटल्यामुळे पगडीचे हे 'राजकारण' राष्ट्रावादीला कितपत लाभणार हे वेळच सांगेल.
@@AUTHORINFO_V1@@