मोदींनी बोलावली मंत्रीमंडळाची आढावा बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

गेल्या वर्षीचा आढावा आणि यावर्षीच्या अजेंड्यावर होणार चर्चा




नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी सर्व मंत्रालयांनी केलेली कामगिरी आणि यावर्षीसाठीची ध्येयधोरणे या दोन महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी पंतप्रधान कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तसेच सर्व मंत्रालयाचे प्रमुख मंत्री आणि प्रतिनिधी देखील याठिकाणी येणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी हे सर्व मंत्रालयांच्या गेल्या वर्षीच्या कामांचा आढावा घेतील व त्यानंतर यावर्षीसाठी मंत्रालयांची ध्येयधोरणे ठरवण्यावर विचारविमर्श करतील. तसेच सरकारच्या कामगिरीची जनसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी काही कार्यक्रमांची देखील ते आखणी करणार आहेत.
मोदी सरकारला यंदा चार वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून सर्व मंत्रालयांकडून त्यांच्या या वर्षीचा कार्यअहवाल जनतेसमोर सादर केला जात आहे. तसेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे सरकारसाठी आपल्या कार्याची माहिती देणे आणि या वर्षीसाठी नवी धोरणे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@