वाड्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याबाबत प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



वाडा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, वाडा शहरात सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केले.

मतदार संपर्क अभियानांतर्गत वाडा तालुक्यातील १४ गावांचा कपिल पाटील यांनी मंगळवारी दौरा केला. त्याचबरोबर वाडा शहरातील भाजप कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, पंचायत समितीचे सभापती अश्विनी शेळके, आदिवासी उपयोजना समितीचे अध्यक्ष अशोक इरनक, तालुकाध्यक्ष संदीप पवार, योगेश बबन पाटील, कुंदन पाटील, मंगेश पाटील, भगवान चौधरी, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

वाडा येथे सुसज्ज वैद्यकीय सुविधा लवकरात लवकर मिळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी खासदार पाटील यांनी रुग्णालय सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

वाडा शहराच्या संपूर्ण विकासासाठी भाजपचे सरकार कटीबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय, खुले नाट्यगृह, शहरात काँक्रीट रस्ते आदींसाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले. वाडा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

वाडा शहराबरोबरच कोनसई, जामघर, मेहरोली, अभंगपाडा, आबीटघर, साठेपाडा, देवघर, काकडपाडा, तीळगाव, सांबारे, चांदोली, तोरणा गावातील ग्रामस्थांबरोबर खा. पाटील यांनी संवाद साधला.

@@AUTHORINFO_V1@@