शाळेनेच काढून टाकले अनधिकृत शाळा म्हणून लावलेले फलक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



टिटवाळा: अनाधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर या शाळांना नोटीस देत या शाळांना त्याच्या दर्शनी भागावर अनधिकृत शाळा असे फलक लावण्यास सांगितले परंतु शाळांनी असे न केल्याने अखेर शिक्षण विभागाने स्वतः हूनच असे फलक लावले. पण या शाळांची दादागिरी इतकी वाढली की त्यांनी हे फलक काढून टाकले.

शासनाने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यात ४७ शाळा अनाधिकृत आहेत. यामध्ये कल्याण तालुक्यात १३ शाळा अनाधिकृत म्हणून शासनाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये वरप येथील नामांकित सेक्रेट हार्ट स्कूल, युनिक इंग्लिश मिडियम शाळा, गोवेली, ओम साई, रायते विश्व वास्तू, खडवली, लिटल चॅम्प्स, म्हारळ, विवेकानंद, सोनारपाडा, नरेंद्र कॉन, सोनारपाडा, आदर्श विद्यालयात लोढा हेवन, खोणी, डायजेस्ट कॉनव्हेट, कोळेगाव, आणि सरस्वती इंग्लिश स्कूल दहिसर अशा शाळांच समावेश आहे. या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घेऊ नये असे अवाहन कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी ललिता कावडे यांनी केले होते. त्याचबरोबर या शाळांच्या व्यवस्थापकांची एक बैठकही त्यांनी घेतली. यानंतर या शाळांना नोटीस बजावली. यामध्ये शाळांच्या मुख्य दर्शनी भागावर अनाधिकृत शाळा असा फलक लावण्यास सांगितले होते. परंतु या कडे शाळा प्रशासनाने लक्ष न देता आपला कारभार राजरोसपणे चालू ठेवला आहे.

यामुळे शेवटी कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने स्वत बॅनर बनऊन या शाळांच्य मुख्य गेटवर लावले होते. परंतु याशाळेच्या शिरजोर मालकांनी ते काढून टाकत शासनाच्या आदेशाला धुडकावून लावल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून अशा शाळा वर कडक कारवाई करण्यात येईल असे सूत्रांकडून समजते .

शाळेसारख्या ज्ञानार्जन करणार्‍या पवित्र अशी वास्तुच अनधिकृत बाबींच्या पायावर उभी असेल तर विद्यार्थांचे भवितव्य ढासळनार नाही याची हमी कोणी घ्यावी ? दिवसेंदिवस शिक्षणासारख्या महान कार्याचा आणि शाळासारख्या पवित्र अश्या वास्तूंचे होणारे बाजारीकरण यातूनच अश्या अनधिकृत गोष्टीं फोफावत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@