डॉ. सुभाष गुजर हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

 

 
नाशिक : भगूर शिक्षण मंडळ संचलित डॉ. सुभाष गुजर हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केले आहे. देवळाली परिसरातील माध्यमिक शालांत परीक्षांच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेने वाढ झाली असून, यावर्षी देखील मुलींनी आघाडी घेतली आहे. देवळाली विभागातून नूतन विद्या मंदिराची प्रतीक्षा काळे हिने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. सेंट पेट्रिक्स हायस्कूलचा प्रथमेश गाडीलोहार ९६.४० टक्के गुण मिळवत दुसरा आला आहे.
 

संस्थेचे अध्यक्ष सुंदरसिंग नरसिंघानी, उपाध्यक्ष घनश्याम केवलानी, चेअरमन नवीन गुरनानी, उपकार्याध्यक्ष अनिल ग्यानचंदानी, सचिव रतन चावला, विनोद चावला यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

असे लागले शाळानिहाय निकाल

 

नूतन विद्यामंदिर

’भगूर शिक्षण मंडळ’ संचालित नूतन माध्यमिक शाळेने आपली सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत, शाळेचा निकाल ९६.७४ लागला आहे. ऐश्वर्या सुरेश करंजकर हिला ९५.४०, साधना पोपट रोकडे व सर्वेश बापूसाहेब चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९५ टक्के गुण मिळविले आहेत. शाळेतील २४ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी पास झाले आहेत.

 

डॉ. सुभाष गुजर हायस्कूल

 

डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या हिंदी माध्यम व इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला असून, यामध्ये इंग्रजी माध्यमातून सोनाली गांगुर्डे प्रथम (९४.८० टक्के), द्वितीयस्थानी आदिती हांडोरे (८९.४० टक्के), तर तृतीयस्थानी मोहिनी गोडसे (८७.६० टक्के) आली आहे. हिंदी माध्यमातून रेणू जयस्वाल, प्रथम (८८.८० टक्के), द्वितीयस्थानी सोनम चव्हाण (८६.८० टक्के), तर तृतीयस्थानी ज्योती कनौजिया (८३.४० टक्के) यांनी यश संपादित केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@