बारवी धरण विस्थापितातील १२०४ पैकी ४६० बाधितांना मिळणार नोकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



कल्याण: महाराष्ट्र औद्योागिक विकास महामंडळातर्फे बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले असून, तोडली गावाचे शंभर टक्के पुनर्वसन रखडले आहे या भागातील पाच गावे व सहा संलग्न पाडे बाधित होत असून, यातील १ ,२०४ पैकी ४६० बाधितांना स्थानिक स्वराज्य संस्थात नोकरी मिळणार आहे, तर उरलेल्या ७४४ जणांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

पाण्याची वाढती मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन, महामंडळाने १९९८ साली धरणाची उंची वाढवण्याचे तिसर्‍या टप्प्याचे काम हाती घेतले. हे काम पूर्ण झाल्यावर धरणाची उंची तीन मीटरने वाढवण्यात आली असून, धरणाच्या पाणीसाठ्यात १८१ द. ल. लि वरून २४० द ल लि म्हणजे ६० द. ल. लि इतके म्हणजे ४० टक्के पाणीसाठा वाढला आहे. प्रकल्पग्रस्तांनी कुटुंबातील प्रत्येक एका कुटुंबातील नोंकरी देण्याची मागणी केली आहे यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाना वाढीव पाणीसाठा देण्यात येणार आहे त्यानी नोकरी द्यावी असा प्रस्ताव नियोजन समितीत मंजूर करण्यात आला. यामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, अंबरनाथ, ग्रामीण भाग, औद्योागिक क्षेत्र यांना पाणीपुरवठा करण्यात येतो.विस्थापितांना नोकरी देण्यासंदर्भात सध्या नियोजन सुरू असून, एकूण १ ,२०४ विस्थापितांपैकी ४६० जणांना लिहिता वाचता येत असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून, इतरांना आर्थिक नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. जी गावे बाधित होणार आहेत त्यात तोंडली, मोहघर व संलग्न पाडे, काचकोळी, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली यांचा समावेश आहे. यापैकी फक्त तोंडली गावाचे पुनर्वसन रखडले असून, सध्या याचे नियोजन चालू आहे अशी माहितीदेखील प्राप्त झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@