निरव मोदी विरोधात आजामीन पात्र अटक वॉरंट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |



मुंबई : पंजाब नॅशनल बँकला तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या निरव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात मुंबई विशेष न्यायालयाने आजामीन पात्र अटक वॉरंट जारी केले आहे. भारतातून फरार झाल्यानंतर निरव मोदी हा ब्रिटेनमध्ये असल्याच्या खुलासा झाल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यामध्ये इडीने निरव मोदीच्या विरोधात तब्बल १२ हजार पानी आरोपपात्र दाखल केले होते. तसेच गेल्याच आठवड्यामध्ये निरव मोदी याने ब्रिटेन सरकारकडे राजाश्रय मागितल्याच्या बातम्या लंडनमधील काही वृत्तपत्रांकडून प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यानंतर इडीने यावर कठोर पाऊले उचलत मुंबईतील धनशोधन निवारण अधिनियम अर्थात पीएमएलएच्या विशेष न्यायालयाकडे याविषयी तक्रार केली. यानंतर पीएमएलए विशेष न्यायालयाने इडीच्या तक्रारीनुसार आणि आरोपपत्राच्या आधारावर निरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात हे वॉरंट जारी केले.

२०१८ च्या सुरुवातीलाचा निरव मोदी याचा पीएनबीमधील घोटाळा उघड झाला. तब्बल १३ हजार रुपयांचा घोटाळा करून निरव मोदी पसार झाला. यानंतर भारत सरकारने यावर कारवाई करत, निरव मोदी पासपोर्ट रद्द केला. तसेच त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरुवात केली. परंतु निरव मोदी मात्र भारत सरकारच्या हाती लागला नाही. गेल्या गेल्या दोन दिवसांपूर्वी निरव मोदी हा लंडनमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच त्याने ब्रिटेनकडे आश्रय मागितल्याचे देखील समोर आले होते. यानंतर भारत सरकारने मोदीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
@@AUTHORINFO_V1@@