वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावणार : आ. सानप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

 

 
नाशिक : 'वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना विमा संरक्षणाचा लाभ देणार आहोत, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापनेचा विषय तातडीने मार्गी लावण्यात येईल आणि नाशिकरोड येथे आमदार निधीतून बांधलेल्या सभागृहाचे हस्तांतरण आवश्यक साहित्यासह लवकरच वृत्तपत्र विक्रेत्यांना करण्यात येईल,” असे अश्वासन भाजप आ. बाळासाहेब सानप यांनी दिले.
 

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कारप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. जेलरोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सरचिटणीस बालाजी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, ’दै. मुंबई तरुण भारत’चे सचिन आडके, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, सातपूर संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर यांसह नाशिक शहरातील विविध वृत्तपत्रांच्या वितरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मगर यांनी केले. सरचिटणीस गौतम सोनवणेंनी स्वागत, तर उपाध्यक्ष महेश कुलथे यांनी सूत्रसंचलन केले. खजिनदार वसंत घोडे, कार्याध्यक्ष अनिल कुलथे, प्रसिद्धिप्रमुख भारत माळवे, सदस्य रवींद्र सोनवणे, योगेश भट, हर्षल ठोसर, उत्तम गांगुर्डे, संदीप परसे, उल्हास कुलथे, जितेंद्र भोसले, बाळासाहेब चंद्रमोरे, सतीश आहेर आदींनी संयोजन केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कराटेपटू वैष्णवी जगदाळे, आंतरराष्ट्रीय धावपटू तानाजी भोर, बारावीत ९३ टक्के मिळवणारा राजेश कुलकर्णी, दहावीत ९३ टक्के मिळवणारी साक्षी जाधव आदींसह शंभरावर गुणवंतांचा सत्कार झाला.

 

कार्यक्रम यशस्वितेसाठी किशोर सोनवणे, बाळू माळी, संजय चव्हाण, संतोष गवळी, ज्ञानेश्वर गवळी, सोमनाथ माळवे, दिपक डहाळे, संदीप डहाळे, मनोहर खोले, संदीप कळमकर, प्रताप गांगुर्डे, विजय रोकडे, आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान कार्यक्रमात दिवंगत वृतपत्र विक्रेते गणेश मांडे, वृत्तपत्र विक्रेते सतीश आहेर यांच्या मातोश्री रुक्मिणी आहेर यांना आदरांजली वाहण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@