मुंबईच्या वरळी भागात इमारतीला भीषण आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |
 
 
 
मुंबई :  मुंबईच्या वरळी भागात असलेल्या ब्यूमोंट इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कुठलीही जीवित हानि झाल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र इमारतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
 
 
 
 
आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची तीव्रता बघून त्वरित अग्निशामक दलाला कळविण्यात आले. त्यामुळे घटनास्थळी त्वरित परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
या परिसरात दोन इमारती आहेत. हा संपूर्ण परिसर रहिवासी असून येथे अनेक घरे आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे
@@AUTHORINFO_V1@@