लालू यादव यांची ४५ कोटी रुपयांची जमीन जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |


पटना : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर सक्तीवसुली संचलनालयने (इडी) आज आणखी एक मोठी कारवाई केली. रेल्वे कंत्राट घोटाळ्याप्रकरणी इडीने लालू यादव यांची ४५ कोटी रुपयांच्या जमिनीवर टाच आणली आहे. लालू प्रसाद यांच्या मालकीच्या एका कंपनीच्या ही जमीन असून रेल्वे कंत्राट घोटाळ्यातून ही खरेदी केली गेल्याचा दावा इडीने केला आहे. त्यामुळे लालू कुटुंबियांच्या अडचणीत यामुळे मोठी वाढ होणार आहे.

पटनामधील दानापूर येथे ही जमिनी असून एकमेकांना जोडलेल्या ११ भूखंडांमध्ये ही जमीन विभागण्यात आलेली आहे. या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ हे जवळपास चार एकर इतके असून याचे बाजार मूल्य ४४.७५ कोटी रुपये इतके आहे. लालू प्रसाद यांना पटना विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर धनशोधन निवारण अधिनियम २००२ (पीएमएलए) नुसार इडीला संबंधित घोटाळ्यासंबंधीच्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर इडीने प्रथम दानापूर येथे येऊन ही जमीन जप्त केली. तसेच जमिनीजवळ संबंधी जप्तीची नोटीस देखील लावली आहे.

 
दरम्यान इडीच्या कारवाईवर लालू कुटुंबियांकडून मात्र अद्याप कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही. या जमिनीबरोबरच लालू कुटुंबीय उभारत असलेल्या एका मॉलचे बांधकाम देखील इडीने बंद केले आहे. तब्बल ७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर उभा राहत असलेला हा मॉल लालू कुटुंबियांच्या मालकीचा होता. परंतु यावर देखील इडीने जप्ती आणल्यामुळे लालू कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत सापडणार असल्याचे दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@