‘योगा फॉर ९ टू ५’ कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या सरकारचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण देशामध्ये सध्या शारीरिकदृष्टीने सक्षम राहण्यासाठी नवेनवे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. हम फिट तो इंडिया फिट अशा नावाचा कार्यक्रम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून चालवण्यात आला आहे. याला राजकीय, सिनेसृष्टीतील आणि सामान्य नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. याच पार्श्वभूमीवर आता आपल्या कामाच्या ठिकाणी आपण कसे योग करू शकतो याचा व्हिडिओ तुम्ही ‘योगा फॉर ९ टू ५’ ला पाठवा आणि बक्षीस मिळवा असा नवा उपक्रम सरकारने राबविला आहे. 
 
 
 
 
 
आपल्या कामाच्या ठिकाणी तुम्ही योगा करून याचा व्हिडीओ आम्हाला पाठवा आणि यातून जो व्यक्ती सगळ्यात चांगला याचा उपयोग करेल त्याला बक्षीस देण्यात येईल असे सरकारने या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हटले आहे. ९ ते ५ या कामाच्या वेळेतील योगाचा व्हिडीओ नागरिक २१ जूनपर्यंत पाठवू शकतात आणि जो व्हिडिओ काहीतरी वेगळा असेल त्याला बक्षीस देण्यात येईल असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. 
 
 
 
योगा करायला तुम्हाला नेहमीच चटईची गरज पडत नाही तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील योगा करू शकतात असे या कार्यक्रमातून जगाला दाखवायचे आहे. यासाठी [email protected] या ईमेल वर तुमच्या योगाचे व्हिडीओ पाठवा असे सरकारने सांगितले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@