अनिकेत पाटलांना विजयी करण्याचा भाजपचा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |

 

 

 

 
नाशिक : नाशिक शिक्षक विभागीय मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिकेत विजय पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अनिकेत पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी जिल्ह्यानिहाय संपर्क आणि सहसंपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले असून, नाशिक महानगरासाठी ही जबाबदारी अनुक्रमे महेश हिरे आणि उत्तमराव उगले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी मंडल स्तरावर प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून, मंडल पदाधिकारी, विभागीय आघाडीप्रमुख आणि नगरसेवक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शिक्षक मतदारांच्या घरोघरी जाऊन, त्यांच्या भेटीगाठी घेणे, छोटेखानी बैठक घेणे, संस्थाचालकांच्या भेटी घेणे आणि शाळा व महाविद्यालयांना भेटी देणे आदी निर्णय यावेळी घेण्यात आले.
 

बैठकीस उमेदवार अनिकेत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रा. सुहास फरांदे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, उत्तमराव उगले, पवन भगुरकर, महेश हिरे, सुनील देसाई, नंदकुमार देसाई, सुनील बच्छाव, प्रा. कुणाल वाघ, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, देवदत्त जेाशी, सुरेश मानकर, बाळासाहेब पाटील, शशिकांत जाधव, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू, संध्या कुलकर्णी, अजिंक्य साने, अमित घुगे, किसनराव विधाते, धनंजय पुजारी, मुकेश शहाणे, मिलिंद भालेराव, शरद मोरे, यशवंत नेरकर, वसंत उशिर, विशाल जेजुरकर आदी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@