अटल टिंकर लॅबसाठी करण्यात आली विदर्भातील ४३ शाळांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |


 
 
विदर्भ :  विदर्भातील एकूण ४३ शाळांची नवड अटल टिंकर लॅबसाठी करण्यात आली आहे. नागपूर येथील ११, अमरावती येथील ६, गोंदिया येथील ५, वाशिम येथीलल ४, चंद्रपूर येथील ४, गडचिरोली येथील ३, वर्धा येथील ३, यवतमाळ येथील ३, अकोला येथील २ तसेच भंडारा आणि बुलढाणा येथील १-१ शाळेचा समावेश यासाठी करण्यात आला आहेत. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आज ही माहिती देण्यात आली.
 
 
 
 
 
 
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त प्रायोगिक ज्ञानावर भर देण्यासाठी सरकारने 'अटल इनोव्हेशन मिशन' योजना सुरू केली आहे. प्रयोग करत असताना त्यातून संशोधक तयार व्हायला पाहिजेत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी या 'अटल टिंकर लॅब' ची सुरुवात सरकारतर्फे करण्यात आली आहे. विदर्भातील ४३ शाळांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
अटल टिंकल लॅबसाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत २० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण ३८७ शाळांना ७७ कोटी ४० लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@