अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको करणार ‘फिफा २०२६’चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
अमेरिका : अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको हे तिन्ही देश ‘जागतिक फुटबॉल कप-२०२६’ अर्थात ‘फिफा’चे आयोजन करणार आहेत. हे तिन्ही देश या फिफा खेळाचे आयोजन करणार असून २०२६ मध्ये ही फुटबॉल स्पर्धा खेळली जाणार आहे. मोरोक्कोमध्ये २०२६ चे फिफा होणार की अमेरिकामध्ये २०२६ चे फिफा होणार याबद्दल संभ्रम होता त्यामुळे यासाठी मत घेण्यात आले असता १३४ मत अमेरिकेच्या बाजूने पडली. 
 
 
 
 
 
१३४ मत अमेरिकेच्या बाजूने पडली असल्याने तसेच मोरक्कोच्या बाजूने केवळ ६५ मते पडली असल्याने ही स्पर्धा आता अमेरिकेमध्ये होणार असे जाहीर करण्यात आले आहे. केवळ एक मत यापैकी एकाही देशामध्ये ही स्पर्धा नाही व्हावी याबाजुने होते. त्यामुळे आता फिफा फेडरेशनने अमेरिकेमध्ये २०२६ ची स्पर्धा होणार असे सांगितले आहे. 
 
 
 
'फेडरेशन इंटरनॅशनल द फूटबॉल असोसिएशन' ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या 'फिफा' या लघुरुपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.
फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे ही आहे. सध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@