राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |

भिवंडी न्यायालयातील सुनावणीनंतर पक्षाचे कार्यक्रमात होणार सहभागी



मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. भिवंडी न्यायालयात रा.स्व. संघाकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी म्हणून ते आज राज्यात आले असून या सुनावणीनंतर मुंबईमध्ये पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
 
दरम्यान काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. मुंबई विमानतळावर गांधी यांच्या स्वगातासाठी अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यासह सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. दौऱ्यानिमित्त सध्या मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी 'महात्मा गांधीं'च्या हत्येप्रकरणी संघासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानावरून संघाचे भिवंडी स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायलयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यासंबंधी सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी म्हणून राहुल गांधी हे भिवंडीमध्ये येणार आहेत.

आज सकाळी ११ वाजता या खटल्यावरील सुनावणीला सुरुवात होईल, त्यासाठी राहुल गांधी यांच्यासह अशोक चव्हाण, संजय निरुपम आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये पक्षाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये गोरेगाव येथे गांधी यांची एक जाहीर सभा होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून सुरु करण्यात येणाऱ्या काही उपक्रमांचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@