लोकप्रतिनिधींनी वृक्षलागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षलागवड परिषद संपन्न


मुंबई  : वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काल वृक्षलागवड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. परिषदेस ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे , पदुममंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेत चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करणाऱ्या नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री मुनगंटीवार म्हणाले की ४ जुलै २०१८ पासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमात आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यक्रम आयोजित करून त्यात सहभागी व्हावे. शक्य होतील तेवढे कार्यक्रम आयोजित करून वृक्षलागवडीसाठी लोकांना प्रेरित करावे. महावृक्षलागवडीचे हे मिशन यशस्वी व्हावे यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून २५ लाख रुपयांपर्यंतचा निधी वृक्षलागवड आणि जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी खर्च करता येणार आहे.
 
 
 
सामाजिक वनीकरण शाखेच्या साह्याने रोहयोअंतर्गत फळबाग लागवड करता येणार आहे, रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीची वैयक्तिक लाभधारकांसाठीची क्षेत्र मर्यादा कोकणासाठी १० हेक्टर असून उर्वरित महाराष्ट्रासाठी ती ४ हेक्टरवरून ६ हेक्टर एवढी वाढविण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@