धक्कादायक : भय्यूजी महाराज यांची स्वत:ला गोळी घालून आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
इंदूर : आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुरु भय्यूजी महाराज यांनी आज स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली आहे. आज सकाळी भय्यूजी महाराज यांनी स्वत:ला गोळी घातली असून यादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याने याचा शोध घेतला जात आहे.
 
 
 
देशातील अनेक मोठे राजकीय प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. भय्यूजी महाराज यांना तलवारबाजी, घोडा चालवणे आणि शेतातील कामे करण्याची खूप आवड होती. भारतातील अनेक राजकीय प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांना स्वत:हून राजकीय लोक संपर्क करीत असत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा देखील भय्यूजी महाराज यांना बोलावण्यात आले होते. 
 
 
त्यांच्या भक्तांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी समजली जात आहे. आज सकाळी इंदूरमध्ये त्यांनी स्वत:ला गोळी घालून स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजकीय क्षेत्रात त्यांना बराच मान होता अनेक राजकारणी त्यांना आपला गुरु मानत होते. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@