पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात आडवाणींविषयी आदर नाही : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 
 
 
मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु आहेत, मात्र मी अनेक कार्यक्रमांमध्ये बघितले आहे की मोदी आपल्या गुरुंचा देखील आदर करत नाहीत. आज मला त्यांच्याबद्दल फार दु:ख वाटतं, काँग्रेस पक्षाने आडवाणी यांना मोदींपेक्षा जास्त आदर दिला आहे, अशी कठोर शब्दात टीका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात आज ते बोलत होते.
 
 
 
 
एक पक्ष म्हणून आम्ही वाजपेयी यांच्या विरोधात अनेक वर्षे काम केले आहे, मात्र आज त्यांची प्रकृती ठीक नसताना मी तातडीने त्यांना भेटायला गेलो कारण एक पंतप्रधान म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आहे, हीच कांग्रेस पक्षाची संस्कृती आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
 
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीगढ मधून भाजप नाहीसा होणार :
 
कर्नाटक येथे भाजपला हार पत्करावी लागली आहे, तर गुजरात येथे देखील भाजपचा विजय हा जेमतेमच होता. आणि आता पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ येथून भारतीय जनता पक्ष नाहीसा होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@