भय्यूजी महाराज यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून हळहळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
इंदूर : आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुरु भय्यूजी महाराज यांनी आज स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली ही बातमी ऐकताच सगळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे सध्या राजकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या बातमीवर दुख: व्यक्त करत ट्वीटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
 
 
 
 
 
 
 
“आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यु मनाला चटका लावणारा आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर याने देखील त्यांच्या निधनानंतर दुख: व्यक्त केले आहे. 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@