शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून आठ उमेदवारांची माघार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |

 

 
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक रिंगणातून भाजपाचे बंडखोर उमेदवार माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांनी माघार घेण्यासाठी भाजपाचे पक्ष पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्नाना अपयश आले आहे. अर्ज माघार घेण्याचा आज, सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार न घेतल्याने आता सोळा उमेदवारांमध्ये थेट लढाई होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
 

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा सोमवार (दि ११ जून) शेवटचा दिवस होता. यातील एकूण सहा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडेच्या उमेदवारीला अडचणी आल्यास दुसरा डमी उमेदवार म्हणून त्यांचे पुतणे कुणाल नरेंद्र दराडे आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेचे प्राचार्य गजानन खराटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर दराडे आणि खराटे यांनी छाननीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे आता पर्यंत आठ उमेदवारांनी माघार घेतली असून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

 

भाजपाच्या तिकिटावर एकदा खासदार आणि दोनदा आमदार राहिलेले भाजपाचे जेष्ठ नेते माजी खासदार प्रतापदादा सोनावणे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांसह मुख्यामत्र्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे.

 

यांनी घेतले अर्ज माघारी

 

महेश भिका शिरुडे (नाशिक), सुनील रमेश बाच्याव (मालेगाव), सुनील धोंडू फरस (मालेगाव), सुरेश पांडुरंग पाटील (जळगाव), दिनेश अभिमन्यू देवरे (नाशिक), प्रकाश हिला सोनावणे (नाशिक).

 

आता यांच्या होणार लढत

 

अनिकेत विजय पाटील (भाजपा), भाऊसाहेब पाटील (टीडीएफ -निरगुडे बादशहा गट), सुनील पंडित (शिक्षक परिषद), अजित दिवटे, अप्पासाहेब शिंदे, अशोक पाटील, किशोर दराडे (शिवसेना पुरस्कृत), पटेकर रविंद्र,विलास पाटील, शांताराम पाटील, विठ्ठल पानसरे, प्रताप सोनवणे, बाबासाहेब गांगुर्डे, संदीप बेडसे (राष्ट्रवादी पुरस्कृत व टीडीएफ बोरस्ते-मोरे गट), शाळीग्राम भिरूड (तिसरी टीडीएफ), महादेव चव्हाण, मुख्तार अब्बास कासीम (अपक्ष)

@@AUTHORINFO_V1@@