दुरुस्तीच्या कामानिमित्त ठाकुर्ली फाटक बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात खोदकाम तसेच फाटक दुरुस्तीच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक सोमवारपासून बंद ठेवले आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे नव्याने बांधण्यात आलेल्या ठाकुर्ली पुलावर हलविण्यात आली आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. पश्चिमेतील या रस्त्यालगत असलेल्या सर्व रस्त्यांचेही काम झाले असले तरी पूर्वेस मात्र स. वा. जोशी शाळेजवळील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. तरी नागरिकांनी राजकीय उद्घाटनाची वाट न पाहाता पुलाचा वापर सुरू केला आहे.

दरम्यान, फाटकातून जाणार्‍या वाहनांमुळे अनेकदा रेल्वेच्या वाहतुकीला त्याचा फटका बसतो, तर दुसरीकडे या फाटकातून जाणार्‍या वाहनांमुळे नेहमीच ठाकुर्ली रेल्वे स्थानकाबाहेर वाहतुकीचा खोळंबा होत असतो. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती पण केडीएमसीच्या दिरंगाईमुळे अद्याप या पुलाचे काम अपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फतवा काढत हे फाटक बंद केले होते पण नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेत अवघ्या काही तासांत हे फाटक उघडण्यात आले. पण आता मात्र पुन्हा दुरुस्तीचे काम पुढे करत हे फाटक बंद करण्यात आले आहे. ठाकुर्लीकडे उतरणार्‍या पुलाचे काम बाकी असताना रेल्वेने हे फाटक बंद केल्याने वाहनचालकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे सारस्वत कॉलनी, छेडा रोड आदी रस्त्यांवर आता वाहतूककोंडी होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@