ग्राहकांना योग्यरितीने धान्य वितरण न केल्यास शिधावाटप दुकानदारांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |



अंबरनाथ: गेल्या काही वर्षांपासून शिधावाटप दुकानांमध्ये चांगल्या दर्जाचे धान्य आणि इतर साहित्य येत असून देखील त्याचे वितरण व्यवस्थित होत नाही, शिधावाटप दुकानदारांनी ग्राहकांना योग्य रितीने धान्य द्यावे; अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या जिल्हा दक्षता समितीच्या सदस्या प्रिया शर्मा यांनी दुकानदारांना दिला.

जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रिया शर्मा यांनी आज मंगळवारी (१२ जून) ला अंबरनाथच्या शिधावाटप दुकानांमध्ये आणि शिधावाटप कार्यालयाला अचानक भेट दिली. अंबरनाथ रेशन कृती समिती अध्यक्ष राजेश कौठाळे यावेळी उपस्थित होते.

अंबरनाथमध्ये शिधावाटपाबाबत ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे समितीच्या सदस्यपदी नियुक्ती होताच अंबरनाथलाच भेट देऊन ग्राहक आणि दुकानदारांच्या भेटी घेण्याचे ठरवले होते आणि तक्रारींचे निवारण करायचे ठरवले होते, असे सदस्या शर्मा म्हणाल्या. मंगळवारी शिधावाटप कार्यालयाला भेट दिली, शिधावाटप नियंत्रक अधिकारी गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणी केली होती. नंतर काही शिधावाटप दुकानांना भेटी दिल्या. दुकानांमध्ये अनियमितता आढळून आली. काही दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रे नादुरुस्त असल्याचे आढळून आले. शिधावाटप दुकानांमध्ये तकार नोंदवही ठेवणे बंधनकारक असताना अशा तक्रारवह्या दिसल्या नाहीत. दुकानांमधून धान्य घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्या दिल्या जात नसल्याचे आढळून आले आणि दुकानदार ग्राहकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवत असल्याचे सदस्या प्रिया शर्मा म्हणाल्या. याबाबत समितीच्या बैठकीत शिधावाटप दुकानदारांना बोलावले जाईल, त्यांना समज दिली जाईल आणि दुकानदारांकडून पुन्हा असे गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रिया शर्मा यांनी दिला.

@@AUTHORINFO_V1@@