सम-विषम पार्किंगमधूनही वाहनांचे ‘लिफ्टिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |



नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोईंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादप्रतिवाद होत असतो. पण जेव्हा पोलीस सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलतात. तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत ठरू शकते का?, असा संतप्त प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

 

शरणपूररोडवरील पंडित कॉलनीत रविवारी दुपारी एका सम तारखेच्या फलकाजवळ चारचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी कारला घेराव घातला. त्यांनी कारवाईला सुरुवात केली. त्याचवेळी कारचालक तेथे आला. आणि त्याने सम तारखेचा बोर्ड असल्याने पार्किंग केल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. यावर उपस्थित पोलीसाने हे फलक कालबाह्य असल्याचे सांगून फलकावर पांढऱ्या खडूने ‘फुली’ मारण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना सोडले. कर्मचाऱ्यांनीही तात्काळ फलकावर फुली मारली. कार पार्किंग केल्याबद्दल त्या चालकाकडून दंड वसूल करून टोईंग वाहन निघून गेले.

 

नो पार्किंगमधील वाहन उचलून नेण्याच्या आणि चालकाशी हुज्जत घालण्याच्या प्रकारावरून टोईंग वाहनावरील कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्यासंदर्भात अनेक तक्रारी वारंवार होत असतात. प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र त्यामुळे टोईंग वाहनावरील कर्मचारी आणि पोलिसांच्या वर्तनात फरक पडलेला दिसत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारामुळे चालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू होती.

@@AUTHORINFO_V1@@