समाजात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची गरज : भिडे गुरुजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |



नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित हिंदूराष्ट्राची निर्मिती करायची असल्यास समाजात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची गरज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्रनिर्मिती करताना रयतेच्या मनात निर्माण केलेली राष्ट्रीयत्वाची भावना सध्या समाजातून लोप पावत असून, शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारणी सत्तेचा उपभोग घेत आहेत. याला सर्वस्वी समाज जबाबदार असल्याची टीका भिडे गुरूजींनी केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी मठात आयोजित सभेत ते बोलत होते. श्री शिवप्रतिष्ठान सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन संकल्पपूर्तीच्या आवाहनासाठी भिडे यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती.

 

निधी संकलनासाठी तुकड्या

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोन्याचे सिंहासन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने तयार करण्याचा संकल्प केला आहे. या सिंहासनासाठी लागणाऱ्या निधीच्या संकलनासाठी जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यांमध्ये समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती भिडे गुरुजी यांनी दिली.

 

बस पेटविण्याचा प्रयत्न

 

काही समाजकंटकांनी सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा न्यायालयाबाहेरील मार्गाने जाणाऱ्या शहर बसवर (एमएच १५ एके ८०१९) दगडफेक केली. तसेच, बस पेटवण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने आग न लागल्याने दुर्घटना टळली. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. सभेत भिडे यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावेळी पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, 'भिडे यांच्या भाषणाचे चित्रीकरण होत असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल,' या पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांचा निषेध मावळला.

@@AUTHORINFO_V1@@