‘शहरसौंदर्य संकल्पना’ डागाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने 'स्वच्छ भारत सर्वेक्षणा’ अंतर्गत शहराच्या सौंदर्याच्या दृष्टीने महपालिका व लोकप्रतिनिधींनी स्टेशन परिसर, काही महत्त्वाचे चौक, विद्यार्थी व सामजिक संस्थांच्या माध्यमातून सुशोभित करण्याचे काम हाती घेतले, पण या प्रयत्नाला शहरातील नागरिकांनी पुरता हरताळ फासला आहे.

 

डोंबिवली रेल्वेस्थानकातील रेल्वेला लागून असलेल्या स्कायवॉकवर तसेच रेल्वे ब्रिजवर 'रुजवू संस्कृती स्वच्छतेची’ या मथळ्याखाली शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन महपालिकेने केले. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद न देता पानाच्या व तंबाखूच्या पिचकाऱ्या चित्रांवर मारत स्वच्छतेच्या व शहर सौंदर्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम नागरिकांनी केले आहे. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास स्कायवॉकवर भिकारी आणि गर्दुल्ले यांचे वास्तव्य व त्यांच्यामार्फत टाकण्यात येणारा कचरा तसेच अनेक फेरीवाले व कामगार कामानिमित्त दररोज डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात दाखल होतात. त्यामुळे स्कायवॉकवरून येता-जाता पान खाऊन या सुंदर चित्रांवर पिचकाऱ्या मारण्यातच काही नागरिक धन्यता मानत आहे.

 

शहर स्वच्छतेबाबत नेहमी पालिका प्रशासनाच्या नावाने बोटं मोडली जातात. मात्र, नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, तरच स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यास मदत होईल. शहर स्वच्छ ठेवणे हे नागरिकांचे देखील कर्तव्य असल्याचे मत काही सुजाण डोंबिवलीकरांनी व्यक्त केले आहे. तर स्टेशन परिसरातील भिंतींवर फेरीवाल्यांनी सामान ठेवण्यात आल्याने हि भितीचीत्रे शाबूत असली तरी शहर सोंदर्याच्या दृष्टीने या चित्रांचा तितकासा फायदा होत नसल्याचे चित्र दिसून येते . बऱ्याचदा हि भिंतीचित्रे विद्यार्थ्यांमार्फत काढली जातात . मात्र जनजागृती व कोणत्याही कठोर कारवाही अभावी नागरीकाकडून सातत्याने हि भीतीचित्रे खराब केली जातात. शहर सौंदर्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टीवर शहरातील सुजाण नागरिक म्हणून नागरिकांची जबाबदारी आहे पण याकारवाई बाबत प्रशासन कमी पडत असल्याचे मत विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी मांडले. तसेच फेरीवाले व दुकानदार यांच्या कडून रात्रीच्या सुमारास टाकण्यात येणारा कचऱ्यामुळे त्यांच्या वर हि दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे.

 

कठोर कारवाई होणारच - आयुक्त गोविंद बोडके

 

शहर सौंदर्याच्या दृष्टीने हि भिंतीचित्रे काढण्यात आली आहेत याचे नागरिकांकडून पालन होणे गरजेचे आहे. या संदर्भात लक्ष घालून त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

@@AUTHORINFO_V1@@