नारायण राणे व स्वाभिमान पक्षाचा अॅंड. निरंजन डावखरे यांना पाठिंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |




ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अॅ्ड. निरंजन वसंत डावखरे यांना माजी मुख्यमंत्री व खा. नारायण राणे आणि स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी मुख्यमंत्री राणे यांचे कोकणात हजारो समर्थक असून, या पाठिंब्याबद्दल नारायण राणे यांचे डावखरे यांनी आभार मानले आहेत.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची डावखरे यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत नारायण राणे यांनी डावखरेंना पाठिंबा दिला. या वेळी भाजपचे आ. प्रसाद लाड उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे आहेत. त्यांचे कोकणात हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे डावखरे यांची निवडणुकीतील स्थिती चांगली झाली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. डावखरेंना पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. दरम्यान, पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी माजी खा. निलेश राणे यांनी कोकण भवन येथे अॅाड. निरंजन डावखरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

 

गेल्या सहा वर्षांत पदवीधर, बेरोजगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न केले. त्यातील अनेक मार्गी लागले आहेत. आगामी काळात मिशन-एज्युकेशनअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात खा. नारायण राणे, माजी खा. निलेश राणे यांच्याशी चर्चा झाली. त्याला दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अॅाड. निरंजन डावखरे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@