पेट्रोलच्या किंमतीत कपात ; नागरिकांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |
 

 
 
मागील काही महिन्यांपासून इंधन दरवाढ हा चर्चेचा विषय ठरत असतानाच आज पेट्रोलच्या किंमतीत कपात करून २० पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. या किंमती आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे इंधन दरवाढीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे.
 
मे महिन्याच्या शेवटी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये अनुक्रमे १५ आणि १७ पैशांनी वाढ करण्यात आली होती. दरम्यान यामुळे पेट्रोलची किंमत ८४ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. मे महिन्यात झालेल्या सलग १४ दिवसांच्या या इंधन दरवाढीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळेच नागरिकांकडून राग व्यक्त केला जात होता.
 
आता मात्र पेट्रोलच्या किंमतीत कपात केल्यामुळे हे दर प्रति लिटर मुंबईमध्ये ८४.४१, दिल्लीमध्ये ७६.५८, कोलकातामध्ये ७९.२५ आणि चेन्नईमध्ये ७९.४८ रुपये इतके झाले आहेत. मात्र या किंमती बघताना या चार मुख्य शहरापैकी मुंबई शहरातील किंमती अत्यंत जास्त आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात होणारी दरवाढ मात्र त्या तुलनेत कमी प्रमाणात होणारी कपात यावर मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@