महाराष्ट्रातील दोन महिला बचत गटांचा राष्ट्रीय सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली :  बीड जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले महिला बचत गट व चंद्रपूर जिल्ह्यातील वैष्णवी महिला बचतगटाला 'दीनदयाल अंत्‍योदय योजना-राष्‍ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन' अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा संस्थेच्या ए.पी. शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमात 'दीनदयाल अंत्‍योदय योजना-राष्‍ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन' अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील महिला बचत गटांना वर्ष २०१७-१८ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव व मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील दोन महिला बचत गटांसह देशभरातील ३४ महिला बचतगटांना सन्मानित करण्यात आले. 
 
 
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार ब्लॉकमधील वर्णी गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. 'दीनदयाल अंत्‍योदय योजना-राष्‍ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन' अंतर्गत चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या बचत गटात एकूण १५ सदस्य असून या सर्व महिला मागास समाजातील आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत या बचतगटाच्या सदस्यांना बचतगट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दशसूत्रीच्या पायावर उभारणी झालेल्या या बचत गटाने आरोग्यसेवा, शिक्षण विषयक जागृती, शासकीय योजनेतील जनसहभाग आणि कायमस्वरूपी उदरनिर्वाह या विषयांवर कार्य केले. प्रति सदस्य प्रति महिना १०० रूपयांप्रमाणे या बचत गटाने जून २०१७ पर्यंत एकूण ६९ हजार ७५० रूपयांचे भांडवल उभे केले. बचतगटाने बँकेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले व त्याच्यावरील व्याजासह परतावा केला. बचतगटातील महिलांनी शिवणयंत्र खरेदी केले व त्या टेलरिंगचे कार्य करीत आहेत. दोन महिलांनी पीठ गिरणी सुरु केली आहे. काही महिलांनी बचत गटाकडून कर्ज घेऊन ऑटो गॅरेज उभारले, काहींनी पानाचे दुकान, डेअरी, शेळी व मेंढी पालन सुरु केले आहे. वर्षाला या महिलांना ३६ ते ४८ हजार रूपये उत्पन्न मिळते. या महिलांचे जनधन योजनेंतर्गत स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले. बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या घरी शौचालय आहे. ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत’ या महिलांचा विमा उतरविण्यात आलेला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@