इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर 'भारता'चे नाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |

कर्णधार सुनील छेत्री थराला मेस्सीनंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू 



मुंबई : येथे आयोजित हिरो इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय फुटबॉल संघाने दमदार प्रदर्शन करत, केन्यावर २-० अशा गुणांनी मात केली आहे. संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विजय मिळवला असून या विजयाबरोबरच इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर देखील आपले नाव कोरले आहे.

विशेष म्हणजे कर्णधार छेत्री हाच या विजयाचा खरा शिल्पकार ठरला आहे. सामन्यामध्ये भारतीय संघाकडून करण्यात आलेले दोन्हीही गोल हे छेत्रीनेच केले होते. खेळाच्या सुरुवातील पहिल्या ८ व्या मिनिटाला छेत्रीने पहिला गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली व त्यानंतर २९ व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताला निर्णय आघाडी मिळवून देत, संघाचा विजय साजरा केला. दरम्यान या दोन गोल बरोबरच आंतरराष्ट्रीयस्तरावर ६४ गोल करणारा छेत्री हा लियोनल मेस्सीनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीसाठी सध्या सर्व स्तरातून त्याची कौतुक केले जात आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी देखील छेत्री याच्या या कार्याची दाखल घेत त्याचे कौतुक केले आहे. 'भारतीय संघाने आज अत्यंत उत्तम कामगिरी केली असून कर्णधार छेत्रीच्या नेतृत्वात केनियाचा २-० ने पराभव केला आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदचा असून या कामगिरीसाठी संघाचे हार्दिक अभिनंदन' असे ट्वीट राठोड यांनी केले आहे.


दरम्यान मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील छेत्री आणि भारतीय संघाचे या विजयासाठी कौतुक केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@