ओवेसींना आव्हान देणारी कोण आहे 'हि' मुस्लीम व्यक्ती ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |

इस्लामवर चर्चेसाठी दिले आव्हान






कट्टर इस्लामवादी नेते म्हणून ओळख असलेले ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी हे सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहेत. चर्चेचा विषय बनण्यामागील मुख्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलियातील एका विचारवंताने त्यांना चर्चेसाठी दिलेले आव्हान हे आहे.


ऑस्ट्रेलियातील मुस्लीम विचारवंत इमाम ताहिदी यांनी ओवैसी यांना इस्लाम याविषयावर चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे. इस्लाम धर्म, त्यातील अनिष्ट प्रथा आणि इस्लाममधील दहशतवादाचे मूळ या विषयांवर चर्चा करण्यासाठी म्हणून ताहिदी यांनी ओवैसी यांनी चर्चेसाठी आव्हान दिले आहे. तसेच ओवैसी यांनी चर्चेदरम्यान आपण मांडलेले मुद्दे हे खोटे असल्याचे सिद्ध केले तर आपण आपल्या 'इमाम' या पदवीचा तत्काळ त्याग करू, असे देखील त्यांनी म्हटले आहे.





दरम्यान ताहिदी यांच्या या आव्हानावर ओवैसीं अगोदर नेटकऱ्यांनीची आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ताहिदी यांच्या अफाट बुद्दीमतेपुढे ओवैसी टिकणार का ? आणि त्याआधी ताहिदी यांचे हे आव्हान ओवैसी स्वीकारणार का ? असे अनेक खोचक प्रश्न नेटकरी विचारत असून यावरून ओवैसी यांना ट्रोल केले जात आहे.









कोण आहे इमाम ताहिदी ?

इमाम ताहिदी हे ऑस्ट्रेलियाचे रहिवाशी असून ते मुळचे इराणमधील आहेत. ताहिदी यांचा इस्लाम धर्म आणि इस्लाम जीवनपद्धतींचा गाढा अभ्यास असून इस्लाममधील कट्टर विचारांचा ते कायम विरोध करत आलेले आहेत. इस्लाममधील अनिष्ट प्रथा रद्द झाल्या पाहिजे, असे त्यांचे कायम धोरण राहिले असून यामुळे अनेक मुस्लीम नेत्यांशी आणि विचारवंतांशी त्यांचे वैचारिक मतभेद आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील कळीचा मुद्दा असलेल्या काश्मीरसंबंधी देखील त्यांनी आपले रोखठोक मत मांडत, 'काश्मीर ही एक हिंदूभूमी असून त्यावर पाकिस्तानचा कसलाही अधिकार नसल्याचे त्यांनी एकदा म्हटले होते. पाकिस्तानच्या जन्मअगोदरपासून काश्मीर हा भारताचा भाग असून पाकिस्तानने काश्मीरवर आपला हक्क सांगणे बंद करावे, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानचा देखील ताहिदी यांच्यावर रोष आहे. .

@@AUTHORINFO_V1@@