प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २६ हजार किमी रस्त्याचे काम पूर्ण - पंकजा मुंडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 2 हजार 618 किमी रस्त्यांची लांबी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी एप्रिल 2018 अखेर 2 हजार 541 किमी लांबीचे रस्ते पूर्ण झालेले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 1 व 2 अंतर्गत आतापर्यंत एकूण 26 हजार 54 किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी केंद्राचा हिस्सा 60 टक्के (300 कोटी) व राज्याचा हिस्सा 40 टक्के (200 कोटी) इतका असून या वर्षासाठी 500 किमी लांबीचे रस्ते 60 वाड्यावस्तींना जोडण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने निश्चित केले आहे, असे ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
 
 
केंद्र सरकार पुरस्कृत ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी, प्रगती व संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती कार्य करत आहे. या समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार राजू शेट्टी, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना) ग्रामविकास विभाग सचिव व्ही. आर. नाईक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, जमा बंदी आयुक्त एस. चोकलिंगम व वरिष्ठ अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
 
 
केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्व काळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सन 2018-19 या वर्षासाठी 1 हजार 722 गावे, वाड्यांचा पेयजल कृती आराखडा तयार करण्यात आला असून या कृती आराखड्याबाबत केंद्र शासन स्तरावर सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार जिल्ह्यांना कृती आराखडा सादर करण्याबाबत निर्देश दिले आहे.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@