१२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : राज्यातील बारा वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी राज्य सरकारने केल्या. यामध्ये मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. जे. कुंटे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुंटे हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तसेच, परिवहन आणि बंदर आणि गृह विभागाचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे.
 

२०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले एम.एम. सूर्यवंशी यांची आदिवासी विकास महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे तर संजय मीना यांची ठाण्याच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी उद्योग, ऊर्जा आणि श्रम विभागातील उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे उद्योग, ऊर्जा आणि श्रम विभागातील उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

 

१९८५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी वंदना कृष्णा यांची शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि विशेष सेवा अधिकारी अनिल डिग्गीकर यांची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर राजगोपाल देवरा यांची वित्त विभागाच्या प्रधान सचिव (सुधारणा) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@