गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांसाठी सेवा सहयोग फाउंडेशनची विद्यार्थी विकास योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |


 

 
गरजू विद्यार्थ्यांनीही संपर्क करण्याचे आवाहन

मुंबई: उत्तम गुणांसह दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहायता मिळवून देणाऱ्या सेवा सहयोग फाउंडेशन - विद्यार्थी विकास योजना या उपक्रमातर्फे पात्रता धारक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

दहावी परीक्षेत किमान ९० टक्के, बारावी परीक्षेत किमान ८५ टक्के तसेच प्रवेश परीक्षेत उत्तम मानांकन प्राप्त करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या शुल्कासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा उपक्रम विद्यार्थी विकास योजनेतर्फे गेल्या सात वर्षपासून चालविण्यात येत आहे. २०१७-१८ या –शैक्षणिक वर्षात महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधील २३० विद्यार्थ्यांना एकूण एक कोटी छत्तीस लाख रुपये इतकी मदत मिळवून देण्यात आली. गेल्या सहा वर्षात मिळून आतापर्यंत केलेल्या मदतीच्या रकमेने पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या ८५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातील उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्या सर्वाना नामवंत संस्थांमध्ये नोकरीच्या संधीही प्राप्त झाल्या आहेत.

समाजातील संपन्न आणि सत्प्रवृत्त व्यक्ती आणि संस्थांकडून निधी गोळा करून तो गरजू गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणाऱ्या सेतूचे काम या संस्थेतर्फे करण्यात येते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु होत असल्याने वरीलप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्कातील सहायतेसाठी संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थी विकास योजनेचे संयोजक रवींद्र कर्वे यांनी केले आहे. तसेच या उपक्रमासाठी निधीचे योगदान द्यावे असेही आवाहन कर्वे यांनी केले आहे.

संबंधितांनी पुढील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे.

ठाणे - रवींद्र कर्वे : ९३२३२३४५८५,               शरद गांगल : ९८२२००७७७,

अरुण करमरकर : ९३२१२५९९४९,                श्रीकृष्ण हंबर्डे : ९८६९२७५०२९

डोंबिवली : महेश वैद्य : ८९७६६५८८२४,           कल्याण : ज्ञानेश्वर गोल्हे : ९८३३८१९२३७,

पुणे : सुनील यादव : ९८२२४१११८९,              आशिष सोनावणे : ८३०८८२५६२५,

औरंगाबाद : मनोज पत्की : ९४२२२०६०८१,        लातूर : प्रदीप नणंदकर : ९४२२०७१६६६

सांगली : श्रीकांत पटवर्धन : ९२२५८२५३९९,        सोलापूर : माधव देशपांडे : ९०४९००७४५०.

@@AUTHORINFO_V1@@