नाकर्त्या सरकारविरोधात सर्वांनी एकत्र या : छगन भुजबळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना आवाहन




पुणे : 'भाजप सरकारने निवडणुकांमध्ये दिलेले एक आश्वासन पाळले नाही. उलट जे चांगले दिवस होते तर देखील घालवले आहेत. त्यामुळे या नाकर्त्या सरकारविरोधात आता सर्व जणांनी उभे राहावे' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज केले. हल्लाबोल यात्रेच्या समारोप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते. विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ हे कार्यकर्त्यांसमोर आले होते.

भाजपने निवडणुकांआधी दिलेल्या सर्व आश्वासनांवर भुजबळ यांनी जोरदार टीका केली. ' देशात चार शहरांची नावे सांगा जी सरकारने चार वर्षात स्मार्ट केली. चार जिल्हे सांगा जिथे स्वच्छता गृह बांधली. चार जिल्हे सांगा जिथे वीज पुरवली. कुठे पाणी पुरवले आहे? गंगा नदीला हे स्वच्छ करणार होते. चार पाऊले तरी गंगा साफ झाली आहे का ?' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच पूर्वी गावात आत्महत्या होत होत्या परंतु आता मंत्रालयात आणि मंत्रालयासमोर आत्महत्या होऊ लागल्या आहेत, या नाकर्त्या सरकारविरोधात लढा द्यायला सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यानंतरच स्वस्थ बसू

राजकीय विरोधाबरोबरच आपल्या लावण्यात आपल्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांविषयी देखील त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये भुजबळ यांचा हात असल्याचा आरोप करत मला अटक केले. परंतु महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी साधा कंत्राटदार देखील मी नेमला नव्हता. परंतु तरी देखील मला अटक करण्यात आली. यानंतर ज्याज्या ठिकाणी भुजबळ हे नाव होते. त्यात्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. पण पोलिसांच्या हाती मात्र काहीच आले. यामध्ये कुटुंबियांना मात्र फार त्रास झाला. पण आपण न्यायदेवतेवर विश्वास ठेवला आणि आज न्यायदेवतेमुळे आपण बाहेर आलो आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच जोपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.


मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

याचबरोबर मराठा आरक्षणाविषयी देखील त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पूर्ण पाठींबा असून वेळ पडल्यास त्यांच्या समर्थांनासाठी आपण रस्त्यावर उतरू, असे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच सरकारने आरक्षणामध्ये वाढव करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
 

राष्ट्रवादी कदापि सोडणार नाही
 
दरम्यान भुजबळ यांच्या राष्ट्रवादी सोडण्याचा अफवांवर देखील त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. आपण तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर अनेक जण आपल्याविषयी उलटसुलट चर्चा करत होते. भुजबळ आता राष्ट्रवादी सोडणार , ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक जण गप्पा मारत होते. परंतु भुजबळ हे कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
@@AUTHORINFO_V1@@