चंद्रकांत दादांकडे कृषीमंत्रीपदाचा पदभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह कृषीखात्याचा अतिरिक्त भार

 

मुंबई : महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कृषी व फलोत्पादन खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर कृषी व फलोत्पान खात्याचा पदभार अद्याप कोणाकडेही सोपवण्यात आला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परदेश दौर्‍यापूर्वी या खात्याचा पदभार चंद्रकांत दादा यांच्याकडे सोपवला आहे. या बाजबत अधिकृत माहिती लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
चंद्रकांत दादा पाटील यांच्या महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातीदेखील आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादा यांच्या खांद्यावर कृषी व फलोत्पादन खात्याचाही अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. १६ जून रोजी परदेश दौर्‍यावरून परतणार आहेत. दि. ४ जुलै रोजी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कृषी व फलोत्पादन खाते अन्य कोणाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. याबरोबर महामंडळांवरदेखील नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांकडून देण्यात आली.

 

 

 

@@AUTHORINFO_V1@@