मतदार संपर्क अभियानांतर्गत खासदार कपिल पाटील यांचा आदिवासी भागात दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |



वाडा: भिवंडी लोकसभा मतदार संघात वाडा तालुका मतदार संघ येतो. मतदार संपर्क अभियानांतर्गत तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी पाड्यांवर राहणार्‍या आदिवासी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि शक्य असल्यास त्या जागेवर सोडविण्याचा प्रयत्न खा. कपिल पाटील यांनी केला. उज्जेनी, परळी अशा आठ आदिवासी गावे आणि पाड्यांवर राहणार्‍या आदिवासी बांधवांची त्यांनी भेट घेतली. यावेळी पावसाळ्यात बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून नदीवर साकव बांधण्याची मागणी केली. सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन दिले. रात्रीच्या वेळी मुक्कामास जी बस येते ती लांब अंतरावर असलेल्या गावी थांबते. त्यामुळे लांब अंतरापर्यंत अकारण पायपीट करावी लागते. एसटी बस उज्जेनी गावात मुक्कामासाठी येण्याची मागणी यावेळी केली. सदर मागणी तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन खा. कपिल पाटील यांनी दिले. आदिवासी बांधवांना ज्या ज्या समस्या भेडसावत होत्या, त्या खुल्या मनाने त्यांनी खासदारांसमोर मांडल्या. खासदारांनीदेखील त्या मन:पूर्वक ऐकून घेतल्या आणि समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. यापुढे लोकसभा मतदार संघांतील अन्य रहिवाशांच्या तक्रारी ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचा कार्यक्रम असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@