चीनमध्ये गाजतोय 'टॉयलेट हीरो'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
 
चीन :  गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार विविध सामाजिक विषयांवरील चित्रपट घेऊन येत आहे. गेल्या वर्षी आलेला 'टॉय़लेट एक प्रेमकथा' हा चित्रपट देखील अशाच एका सामाजिक विषयावर आधारित होता. आनंदाची आणि गौरवाची बाब म्हणजे हा भारतीय चित्रपट चीनमध्ये देखील 'टॉयलेट हीरो' या नावानेप्रदर्शित करण्यात आला आणि चीन येथे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

चीन येथील एकूण ४३०० स्क्रीन्स म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला चीन येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. याविषयी अक्षय याने आपल्या ट्विटर खात्यावरून चीनी नागरिकांचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला आहे. स्वच्छता आणि स्वच्छतागृहांचे महत्व या विषयावर आधारित या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणात दाद दिली. यामध्ये अक्षय कुमार आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकरतायेत.
 
 
 
 
 
या चित्रपटाने चीन येथे पहिल्याच दिवशी १५ कोटी ९४ लाख रुपयांची कमाई करत विक्रम केला. या चित्रपटाचे ५६ हजार हून अधिक शो एकादिवशी चीन येथे दाखवण्यात येत आहेत. दंगल, सीक्रेट सूपरस्टार, बजरंगी भाईजान, बाहुबली-२ आणि हिंदी मीडियम या चित्रपटांनंतर चीन मध्ये २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात येणारा हा ६वा चित्रपट ठरला आहे. भारतासाठी निश्चितच ही एक गौरवाची बाब आहे. भारतात या चित्रपटाने गेल्यावर्षी १३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@