खा. संजय राऊत यांचा आणखी एक जावईशोध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |


मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्‍तव्य करून, वाद ओढावून घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आगामी काळात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला.

खासदार राऊत म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करण्याची तयारी करत आहे.” एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना खासदार राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, “आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला ११० जागा गमवाव्या लागतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. दरम्यान, राऊत यांच्या या विधानावर राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप सोहळा दि. ७ जूनला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली असतानाही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

@@AUTHORINFO_V1@@