भारताच्या सुरक्षेविषयी कुठलीही तडजोड नाही : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
 
किदंगाओ (चीन) :  भारताच्या सुरक्षेविषयी कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. भारतासाठी भारताची आणि येथील नागरिकांची सुरक्षा सर्वतोपरी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. चीन येथील किदंगाओ येथे आयोजित करण्यात आलेल्या शंघाई सहयोग संगठन म्हणजेट एससीओ शिखर संमेलनात आज ते बोलत होते.
 
 
 


यावेळी दहशतवाद आणि सीमेवरील सुरक्षा विषयांवर चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तान दहशतवादाच्या प्रभावाचे एक दुर्दैवी उदाहरण आहे. "मी आशा करतो पंतप्रधान अशरफ घनी यांनी सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांचा सर्व देश आदर करतील." असे म्हणत त्यांनी नाव न घेत पाकिस्तानवर निशाणा साधला.
 
 
 
 
पर्यटनात वाढ करण्याचे आवाहन :
भारतात पर्यटनासाठी एससीओ देशांपैकी केवळ ६ टक्के नागरिक येतात, या आकड्याला नक्कीच द्विगुणीत करता येऊ शकतं. आपल्या राष्ट्रांच्या संस्कृतीविषयी माहितीचे आदान प्रदान केल्याने हे नक्कीच शक्य होवू शकतं, असेही ते यावेळी म्हणाले. "भौतिक आणि डिजीटल कनेक्टिविटीने भूगोलाची परिभाषा बदलली आहे. आज सर्वच देश एकाच मंचावर आलो आहोत. त्यामुळे या देशांमधील "कनेक्टिविटी" वर आमचा भर असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@