प्रस्तावित भेटीसाठी ट्रम्प-किम सिंगापूरमध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |


सिंगापूर :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रस्तावित भेटीसाठी दोन्ही नेते सिंगापूरमध्ये आज दाखल झाले आहेत. येत्या मंगळवारी सकाळी ९.३० वाजता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असून या भेटी अगोदर सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग हे या दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान आज दुपारीची किम जोंग उन आणि त्यांचे शिष्टमंडळ हे सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी सर्वात अगोदर किम जोंग उन यांनी सिंगापूर पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांची काही काळ चर्चा केली होती. काही काळ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर किम यांना विश्रांतीसाठी पाठवण्यात आले. यानंतर काही वेळापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सिंगापूरमध्ये आगमन झाले. यावेळी सिंगापूर प्रशासन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींकडून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले.



येत्या १२ तारखेला सिंगापूरमध्ये सेंटोसा रिसॉर्ट येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प हे किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या वैमनस्यानंतर अखेर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात पहिल्यांदाच चर्चा होणार असल्यामुळे सध्या सर्व जगाचे लक्ष या बैठकीकडे लागलेले आहे. याबैठकीनंतर अमेरिका आणि उ.कोरिया यांच्यात एक नवे मैत्रीपर्व सुरु होण्याची अपेक्षा सध्या सर्व जगाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याबैठकीत नेमकी काय चर्चा होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@