जेईईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, देशात प्रणव गोयल प्रथम क्रमांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यामध्ये रुडकी येथील प्रणव गोयल या विद्यार्थ्यांने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सोबतच दिल्लीच्या मीना या विद्यार्थिनीने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
 
 
 
 
आयआयटी कानपूरने हे निकाल जाहीर केले आहेत. jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. जेईईई मेन्स परीक्षेचे निकाल एप्रिल मध्ये जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर २० मे रोजी एडव्हान्स परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर आता महाविद्यालय वाटप आणि समुपदेशन प्रक्रियेला सुरुवात होईल.
 
 
 
 
देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी देशभरातून २ लाख २४ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. २० मे'ला आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@