मी इफ्तार पार्टी देणार नाही : राजा सिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

ज्यांच्या धर्मग्रंथात हिंदूंना कापण्याचा आदेश आहे त्यांना मी पार्टी कशी देऊ ? : राजा सिंग

 
 
 
गोशामहल (तेलंगाणा) : मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी मी रमझान महिन्यात इफ्तार पार्टी देणार नाही असे परखड मत तेलंगाणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांनी व्यक्त केले आहे. राजा सिंग यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांनी या संदर्भात आज एक लाईव्ह व्हिडिओद्वारे लोकांशी संवाद साधला. मला काही लोकांनी मतदारसंघातील मुसलमानांना इफ्तार पार्टी देण्याविषयी सुचवले. सर्वच आमदार सध्या इफ्तार पार्टी देत आहेत त्यामुळे तुम्हीही द्या असा आग्रह त्यांनी मला केला. मात्र त्यांना मी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे राजा सिंग यांनी सांगितले.
 
 
 
कोण आहेत  टी. राजा सिंग?

राजा सिंग हे तेलंगाणातील हैद्राबाद शहरातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून हैद्राबादमध्ये होणाऱ्या श्रीरामनवमी यात्रेच्या भव्य आयोजनामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले आहेत. राजा सिंग हे गोरक्षणासाठीही प्रसिद्ध आहेत. हैद्राबादमध्ये चालणाऱ्या गोवंशाच्या अवैध व्यापाराला त्यांच्या कार्यामुळे चांगलाच आळा बसलेला आहे. एक प्रखर हिंदुत्त्ववादी चेहरा म्हणून राजा सिंग देशभर परिचित आहेत.
 
 
ज्यांच्या धर्मग्रंथात गैर मुस्लिमांना अर्थात हिंदूंना संपवा, त्यांना कापून काढा, त्यांच्या महिलांवर अत्याचार करा, त्यांच्याकडून कर वसूल करून घ्या, त्यांना बाटवा असे स्पष्ट आदेश दिले आहेत त्यांच्या इफ्तार पार्टीत मी कसा जाऊ आणि अशांना मी इफ्तार पार्टी कशी देऊ असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच इफ्तार पार्टी देणारे हे मतांचे भिकारी असतात असा घणाघाती आरोप राजा सिंग यांनी यावेळी केला. राजकारणासाठी, निवडणुकांसाठी मी असे लांगूलचालन करणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत उभे राहायचे अथवा नाही ते पाहता येईल मात्र त्यासाठी मी असे कार्य करणार नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@