मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करीन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |



मुंबई: ‘माझा न्यायदेवतेवर विश्वास होता... आहे आणि तो राहिल. मी न्यायदेवतेपुढे माझी बाजू मांडणार आणि स्वत:ला निर्दोष सिद्ध करणार’, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र सदन बांधण्याच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आले होते. १४ मार्च २०१६ पासून म्हणजे जवळजवळ २५ महिन्यापेक्षा जास्त काळ छगन भुजबळ तुरुंगात होते. पक्षाच्या बाहेर काय जायचे, पक्षात राहुन तुम्ही आम्ही केलेल्या चुका सुधारण्याचे काम तुम्हा आम्हाला करायचे आहे असे म्हणत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नाही,असे स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@