देशातील पहिल्या मीडिया इनक्युबेशन सेंटरच्या कन्सल्टंटपदी अनिल वळसंगकर यांची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |


 
 
भोपाळ :  मध्य प्रदेशातल्या भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी जर्नालिझम युनिव्हर्सिटीत भारत सरकारच्या नीती आयोगाच्या अटल ईनोव्हेशन मिशन अंतर्गत मीडिया इनक्युबेशन सेंटरच्या कन्सल्टंटपदी सोलापुरचे सुपुत्र अनिल वळसंगकर यांची नियुक्ती झाली आहे. ही युनिव्हर्सिटी आशिया खंडातली पहिली जर्नालिझमची युनिव्हर्सिटी आहे. भारतातील माध्यम क्षेत्रातील अशा प्रकारचे हे एकमेव इनक्युबेशन सेंटर आहे.
 
print , radio , electronic, digital media उद्योजक घडविण्यासाठी उद्योगाची संकल्पना , भांडवल उभारणी, मार्केटींग , मेंटाॅरींग या द्वारे नवउद्योजकांसाठी हे इनक्युबेटर कुलगुरु डाॅ जगदीश उपासनी यांचा मार्गदर्शनाखाली कार्यरत करण्याची जबाबदारी अनिल वळसंगकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वळसंगकर यांनी सोलापुरातुन पत्रकारीतेची पदवीचे , सामाजिक कार्यातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
 
असे एक इनक्युबेशन सेंटर उभे राहणे भारतासाठी एक महत्वाची बाब आहे. यामुळे भविष्यातील पत्रकारांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल. तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, व्यवसायाचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने हे इनक्युबेशन सेंटर खूप महत्वाचे मानले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@